महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाणी पुरवठ्याअंतर्गत बांधलेल्या विहिरीत घोटाळा; अंभियंत्यासह कंत्राटदारावर कारवाईची मागणी - devari gondia

विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करून देण्याचे आश्वासन दिले.

विहीर

By

Published : Jun 18, 2019, 8:02 AM IST

गोंदिया- देवरी तालुक्यातील पालांदूर(जमी) येथे चुंभली नदीच्या तिरावर पुरक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विहिरीचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याने विहीर एका बाजूला झुकलेली आहे. त्यामुळे नदीचा प्रवाहाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कंत्राटदारासह अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

विहीरबद्दल माहिती देताना ग्रामस्थ

स्थानिक पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत १ कोटी ४ लाख ३० हजार १७५ रुपये खर्चाची नळ योजना १६-१७ मध्ये मंजूर करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत अंदाजपत्रकाप्रमाणे १९ लाख रुपये खर्चून चुंभली नदीच्या तिरावर विहिरीचे बांधकाम करण्यात आले. या विहिरीतून नागरिकांना पाणी मिळणार होते. मात्र, ज्या विहिरीतून पाण्याचा उपसा करून पुरवठा करावयचा होता. ती विहीरच सदोष असल्याने १ कोटी रुपयाच्या पाणी पुरवठा योजनेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

संबंधित अभियंत्याने २० फुट व्यासाच्या विहिरीचे बांधकाम करताना वरच्या भागाला १९.६ व्यासाची रिंग तयार केली. परिणामी विहिरीचे बांधकाम एका बाजुला झुकले असून ती कोसळण्याची सुध्दा शक्यता नाकारता येत नाही. ग्रामस्थांनी ही बाब सदर कंत्राटदार आणि अभियंत्यांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी विहिरीला दोरीने बांधून जेसीबी, पोकलॅड सारख्या यंत्राने सरळ करून देण्याचे आश्वासन दिले. पैसे वाचवण्यासाठी कंत्राटदारांनी विहिरीचा व्यास वरील भागाला कमी घेतल्याचे बोलले जात आहे. विहिरीचे सदोष बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच अभियंत्यावर निलबंनाची कारवाही करून विहीर बांधकामाचा खर्च वसूल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details