महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Blood Letter To Raj Thackeray : वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने राज ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र - एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण

गोंदियात वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विशाल ढेबे या विद्यार्थ्याने राज ठाकरेंना रक्ताने पत्र लिहिले आहे. महाराष्ट्रात राजकारणी अराजकता निर्माण करत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण तयार होत आहे. राजकारणी स्वतःच्या हितासाठी राजकारण करत असून एकमेकांवर कुरघोडी करत असल्याची भावना त्याने पत्रात लिहली आहे.

Vashal Dhebe
विशाल ढेबे

By

Published : Jul 18, 2023, 10:23 PM IST

विशाल ढेबे यांची प्रतिक्रिया

गोंदिया : राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सर्वसामान्यांपासून तर नोकरदारवर्गही आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. नागरिक आता राजकारणाच्या खालावलेल्या स्तरावर चिंता व्यक्त करु लागले आहेत. अशा राजकीय परिस्थितीमुळे राज्यातच नव्हे तर देशातही अराजकता, भीतीचे वातावरण तयार होत असल्याच्या भावना युवकांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. अशाच प्रकारची भावना गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात व्दितीय वर्षात शिक्षण घेणाऱ्या युवकाने व्यक्त केली आहे. त्याने थेट मनसे प्रमुख राज ठाकरेंना रक्ताने पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत. सध्या रक्ताने लिहिलेले त्या युवकाचे पत्र समाजमाध्यमावर व्हायरल झाले आहे.

राज ठाकरेंना लिहिले रक्ताने पत्र : विशाल ढेबे असे या विद्यार्थ्याचे नाव असून गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तो एमबीबीएसच्या व्दितीय वर्षात आहे. या विद्यार्थ्याने स्वतःच्या रक्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून महाराष्ट्राच्या राजकारणाची धुरा सांभाळावी, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार सोबत अजित पवार गटाने हात मिळवणी केल्यानंतर राजकारणात चालले, तरी काय असा प्रश्न युवकांसमोर उभा राहिला.

एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण :त्याने पत्रात ठाकरेंना लिहिले आहे की, सध्या महाराष्ट्रामध्ये अराजकता वाढली आहे. राजकारणी हे ज्वलंत प्रश्नांकडे कानाडोळा करीत आहेत. स्वतःच्या हितासाठी राजकारण करत असून एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण त्यांनी सुरू केले आहे. समृद्धी महामार्गावर एवढा मोठा अपघात होऊनसुद्धा आपले लोकप्रतिनिधी हे शपथविधी घेतात. महाराष्ट्रात अनेक महत्त्वाचे प्रश्न असून महिला सुरक्षित नाही, अशा भावना त्याने व्यक्त केल्या आहेत.

महाराष्ट्राला राज ठाकरे यांचा एकमेव पर्याय : शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करीत आहेत. मुलांच्या शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत. शासन आपल्या दरबारी या योजनेतून योजना सरकार लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जनतेचे प्रश्न काय आहेत? ते प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कोणतेही प्रयत्न करीत नसल्याची खंत पत्रात लिहिली आहे. यामुळेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आपण या महाराष्ट्राला वाचवण्यासाठी महाराष्ट्राची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी अशी विनंती पत्रातून केली आहे. महाराष्ट्राला गौरव मिळवून देण्यासाठी तुम्हीच एकमेव पर्याय असल्याचे विशाल ढेबे या विद्यार्थ्याने रक्ताने लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.

हेही वाचा - Raj Thackeray Konkan visit : फोडाफोडीचे राजकारण आम्हाला मान्य नाही, राज ठाकरेंचा भाजपला टोला

ABOUT THE AUTHOR

...view details