गोंदिया- कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. यात रेल्वे प्रवासही बंद करण्यात आला होता. मात्र, कालांतराने हळूहळू अनलॉक प्रकिया सुरू होत असून, रेल्वेही हळू हळू रुळावर येत आहे. महत्वाचे म्हणजे, गोंदियाहून मुंबईला जाणारी विदर्भ एक्स्प्रेस नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. त्यामुळे, प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
अखेर विदर्भ एक्स्प्रेस सुरू... सर्वसामान्यांना दिलासा - Vidarbha Express on track
जिल्ह्यातील लोकांना मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस रेल्वे सोयीस्कर होती. मात्र, ती लॉकडाऊन काळापासून बंद होती. गोंदिया रेल्वे जंक्शन ते मुंबईला जाणारी लांब पल्ल्याची गाडी म्हणून विदर्भ एक्स्प्रेसची ओळख आहे. ही गाडी आज गोंदिया जंक्शनवरून मुंबईला रवाना झाली.
जिल्ह्यातील लोकांना मुंबईला जाण्यासाठी विदर्भ एक्स्प्रेस रेल्वे सोयीस्कर होती. मात्र, ती लॉकडाऊन काळापासून बंद होती. गोंदिया रेल्वे जंक्शन ते मुंबईला जाणारी लांब पल्ल्याची गाडी म्हणून विदर्भ एक्स्प्रेसची ओळख आहे. ही एक्स्प्रेस आज गोंदिया जंक्शनवरून मुंबईला रवाना झाली. त्यामुळे, सर्वसामान्यांनी आनंद व्यक्त केला आहे. विदर्भ एक्स्प्रेस सुरू झाल्याने २१५ लोकांनी तिचे आरक्षित टिकीट काढले होते. मात्र, १२२ लोकांनीच आज या रेल्वेने प्रवास केला.
हेही वाचा-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी