गोंदिया - जिल्ह्यात अवैध गौण खनिज चोरीवर आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून गौण खनिज चोरी करणाऱ्यांवर दंड ठोठाविण्यात येत आहे. परंतु, अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या 105 वाहनांवर पहिल्यांदाच जिल्हा महसूल प्रशासनामार्फत कारवाई करून वाहनांचे नोंदणी परवाने निलंबित करण्यात आले आहेत. ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांमार्फत शुक्रवार, 22 जानेवारी 2021 रोजी करण्यात आली आहे.
गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणी जिल्हा महसूल प्रशासनाची कारवाई अवैध गौण खनिज वाहतूक प्रकरणात महसूल अधिकारी-कर्मचारी हे रात्रंदिवस गस्त घालतात. या वेळेस त्यांच्यावर प्रसंगी हल्ले देखील झाले आहेत. गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी गौण खनिज उत्खनन प्रकरणात बैठक घेऊन पोलीस अधीक्षकांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक गोंदिया : अवैध गौण खनिज वाहतूक हेही वाचा -मेळघाट : मुलींच्या शासकीय वसतीगृहात बनावट दारू तयार करणाऱ्या टोळीला अटक
गौण खनिज अवैध उत्खनन व अवैध वाहतूक प्रकरणी 105 वाहनांवर कारवाई
गौण खनिज अवैध उत्खनन व अवैध वाहतूक प्रकरणात एकूण 105 वाहनांवर मोटार वाहन कायदा 1988 व 1989 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. सदर वाहनांचे नोंदणी परवाने निलंबन झाल्यानंतर आता ही वाहने रस्त्यावर धावू शकणार नाहीत, यासाठी या वाहनांना पुढील 90 दिवस पोलिसांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही जिल्हाधिकार्यांच्या निर्देशान्वये करण्यात आली. तर, सर्व वाहन धारकांना पत्र देऊन वाहने त्यांच्या संबंधित पोलीस ठाण्यात जमा करण्याचे पत्र देखील देण्यात आले आहे.
गौण खनिज चोरी प्रकरणात वापरण्यात आलेल्या वाहनांचे नोंदणी परवाने निलंबित करण्यात आले आहेत. या विषयी कारवाई करण्यात आलेल्या 105 वाहनांमध्ये गोंदिया ग्रामीण ठाणे 15 वाहने, रावणवाडी 39 वाहने, अर्जुनी-मोरगाव 20 वाहने, देवरी 5 वाहने, गोरेगाव 6 वाहने, दवनीवाडा 18 वाहने, गंगाझरी 1 आणि रामनगर गोंदिया येथील एका वाहनाचा समावेश आहे.
निलंबित केलेले परवाने
तसेच नोंदणी-परवाना निलंबन केलेल्या 92 ट्रक्टर, ट्राली 74, ट्रक/टिप्पर 4, नंबर प्लेट नसलेली ट्रक्टर 44, नंबर प्लेट नसलेली ट्राली 26, इतर राज्यातील ट्रक्टर 2, इतर राज्यातील ट्राली 1 आणि इतर राज्यातील 1 टिप्परचा समावेश आहे. पुढील भविष्यात अवैध खनिज उत्खनन प्रकरणात आढळल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिलेले आहेत.
हेही वाचा -आमदाराने ७ गाड्या दारू पकडूनही गृहमंत्र्यांना हवी 'स्पेसिफिक केस', पत्रकारांनाही म्हणाले प्रकरण द्या