गोंदिया - जिल्ह्यात गेल्या दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका शासकीय धान (भात पीक) खरेदी केंद्राला बसला आहे. तिगाव खरेदी केंद्रात गेल्या २० ते २५ दिवसांपासून परिसरातच धान साठवून ठेवण्यात आले होते. या धानाला पावसामुळे अंकूर फुटल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
हे धान केंद्रावरून परत नेण्याची वेळ आता शेतकऱ्यांवर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्रीच्या माध्यमातून तालुक्यात धान खरेदी केंद्र सुरू आहे. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होऊ नये, हा यामागचा मुख्य उद्देश. मात्र, आता याच केंद्राच्या नियोजन शुन्यतेमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. शुक्रवारपासून सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास ७ हजार पोते धान पावसात भिजले.
हेही वाचा - सारखे सांगून समजत नसेल तर धडा शिकवावा लागतो, पवारांचा भाजपला टोला