गोंदिया - जिल्ह्यात आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली तर मध्यरात्री वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली असून याचा सर्वाधिक फटका अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळाला बसला आहे.
अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, आमदारांनी केली पाहणी
वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली तर मध्यरात्री वाऱ्यासह मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. काही ठिकाणी गारपीटदेखील झाली असून याचा सर्वाधिक फटका अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळाला बसला आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी मंडळात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने रब्बी पिकाचे तसेच मका पिकाचे मोठे नुकसान झाले. गारपिठीने धानाचे (भात) बियाणे संपूर्ण जमिनीवर पडले. या भागात मोठ्या प्रमाणात मक्याची शेती केली जात असून काही शेतकऱ्यांचा तोडून ठेवलेला मका पाण्यात भिजला, काही ठिकाणी मळणी करून ठेवलेला मका हा पूर्णतः पाण्यात भिजल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या भागाची आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी कृषी अधिकारी तसेच उपविभागीय अधिकऱ्यांसह पाहणी केली. नुकसानग्रस्त शेतीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारकडून या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे अश्वासन त्यांनी दिले. आधीच लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असताना आता शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे.