गोंदिया -गुरुवारी मध्यरात्री अज्ञातांनी श्रीनगर भागात उभ्या असलेल्या वाहनांना आग लावल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील श्रीनगर भागात काही अज्ञातांनी दोन ते तीन चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
वाहनांना अज्ञातांनी लावली आग अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल -
मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी या वाहनांना आग लावली. यावेळी वाहनाचे टायर जळून फुटल्याने आवज होताच. परिसरातील लोकांना या घटनेची माहिती झाली. सध्या पोलीस या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेत आहे. यात एका लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनाचाही समावेश आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच अज्ञात आरोपींविरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोद करण्यात आला आहे.
हेही वाचा - कोण होणार विधानसभा अध्यक्ष; तर कोणाच्या गळ्यात पडणार मंत्री पदाची माळ? काँग्रेसमध्ये खलबतं