गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या द्वारकाधाम बनगाव येथील भवनगिरी यांच्या घरी 2 फेब्रुवारीला रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात चोरांनी बंदूक व चाकूचा धाक दाखवून 2 लाख 47 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. या दोघा चोरांना आमगाव पोलिसांनी अटक केली असून दोन्ही आरोपींना 11 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
बंदुकीचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक, आमगाव पोलिसांची कामगिरी - latest gondia news
मोहम्मदला अटक केल्यावर विचारपूस केली असता दुसरा आरोपी भडके हा देवरी येथे राहत असल्याचे पोलिसांना कळाले.
दोन आरोपींपैकी एक आरोपी बनगावातील असून मोहम्मद अख्तर इकबाल मोगल असे त्याचे नाव आहे. दुसरा आरोपी देवरी येथील पंचशील चौक येथे राहणार असून विनम्र उर्फ नितेश जगदीश भडके असे त्याचे नाव असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. मोहम्मदला अटक केल्यावर विचारपूस केली असता दुसरा आरोपी भडके हा देवरी येथे राहत असल्याचे पोलिसांना कळाले. घरी जाऊन त्याला ताब्यात घेत असताना आरोपीने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे त्याच्याकडून जप्त करण्यात आली. सोबत चोरी गेलेले 80 ग्रॅम सोन्याचे दागिने त्याच्या जवळ मिळाले असून दोघांवर आमगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.