गोंदियात मालवाहक वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू - तिरोडा पोलीस
गोंदिया येथे मालवाहक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला. मालवाहक चालक सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
गोंदिया येथे मालवाहक आणि दुचाकीच्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला
गोंदिया - गोंदियाच्या दिशेने येणाऱ्या मालवाहकाने गोंदियाकडून तिरोडाकडे जाणाऱ्या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवरील दोघांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यु झाला आहे. ही घटना तिरोडा येथील अदानी पॉवर प्लांट जवळ घडली.