गोंदिया - भरधाव दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी रोडवर हा अपघात झाला. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये देवानंद देवराम मेश्राम (21 वर्ष, रा. ईसापूर) समीर अरुण मेश्राम (19 वर्ष रा. नान्होरी दिघोरी) अशी आहेत.
गोंदियात भरधाव दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू - गोंदिया न्यूज
भरधाव दुचाकीने उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बोंडगाव देवी रोडवर हा अपघात झाला. ही घटना रात्री ८ च्या सुमारास घडली. मृतांमध्ये देवानंद देवराम मेश्राम (21 वर्ष, रा. ईसापूर) समीर अरुण मेश्राम (19 वर्ष रा. नान्होरी दिघोरी) अशी आहेत.
भरधाव दुचाकीची ट्रकला धडक, दोघांचा जागीच मृत्यू
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ईसापूर येथील देवानंद मेश्राम हे आपले नातेवाईक समीर मेश्राम यांना नान्होरी दिघोरी येथे टी.वी.एस. (एम.एच.36 - जे. 1863) या दुचाकवर घेऊ जात होते. अर्जुनी मोर-बोंडगाव देवी रोडवर निमगाव बसस्थानकाजवळ सिमेंटने भरलेला ट्रक (सि.जी. 04 जे.सी. 2263) रस्त्याच्या कडेला उभा होता. सदर दुचाकीने भरधाव वेगाने येऊन उभ्या ट्रकला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले.