गोंदिया -शेतात काम करताना वीज कोसळण्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास घडली.
वीज कोसळून दोघांचा मृत्यू; गोंदिया येथील घटना - lightning strike gondia
किशोरी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. दरम्यान, शेतात भात लागणीचे काम करून घरी जात असताना वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील किशोरी येथे घडली.
किशोरी परिसरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह सुमारे अर्धा तास जोरदार पाऊस झाला. दरम्यान, शेतात लागणीचे काम करून घरी जात असताना वीज पडून दोन जणांचा मृत्यू झाला. पहिली घटना अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील किशोरी येथे घडली. तुकाराम दागो गोबाडे (वय - 64, रा. केशवराव सागर) असे मृताचे नाव आहे.
तर दुसरी घटना तिरोडा तालुक्यातील बिहिरिया येथे घडली. गणेश अंबुले (19) असे येथील मृताचे नाव आहे. तर नंदू प्रभाकर ननावरे (32), सुषमा अंबुले (रा. बिहिरिया) असे वीज पडून जखमी झालेल्यांची नावे आहेत. यानंतर जखमींना गोंदिया येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी, पोलिसांनी आकस्मिक नोंद केली.