गोंदिया - जिल्ह्याचे सलगरित्या दोन पालकमंत्री पद भूषविणाऱ्या दोन मंत्र्यांना ईडीच्या चौकशी नंतर अटकेला सामोर जावे लागले. त्यामुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री पद आणि ईडीची अटक कारवाई केवळ योगायोग आहे का, अशी चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे.
हेही वाचा -Gondia Crime News : गोंदियात शालेय पोषण आहाराची चोरी, दोघेजण ताब्यात
विशेष म्हणजे, ईडीकडून अटक होणारे हे दोन्ही नेते राष्ट्रावादी कांग्रेस पक्षाशी संबधित आहे. गोंदियाचे पालकमंत्री राहिलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आणि आता विद्यमान पालकमंत्री तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली आहे.
गोंदिया जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रावादी सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी 2005 ते 2009 व 2009 ते 2014 या साली गोंदियाचे पालकमंत्री पद भूषविले. पुन्हा महाविकास आघाडी सरकार तयार होताच 2019 साली ते राज्याचे गृहमंत्री झाले. गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांनी भूषविले मात्र माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडून 100 कोटी वसुलीच्या आरोपांखाली त्यांची ईडीकडून चौकशी झाली होती. त्यांच्या अटकेनंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी विराजमान झाले, मात्र अल्पावधितच जमीन खरेदी विक्री प्रकरणात त्यांना ईडीकडून आज अटक झाली. आधीच गोंदिया जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल ईडी चौकशीला सतत सामोरे जात असताना गोंदियाचेच सलग दोन पालकमंत्री असलेले राष्ट्रवादी नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना झालेली ईडी अटक केवळ योगायोग आहे का, अशी चर्चा जिल्ह्यात जोर धरत आहे.
हेही वाचा -MGNREGA Scheme in Gondia : मनरेगा अंतर्गत ९७ हजार मजुरांच्या हाताला काम; मोबदला वाढवण्याची मागणी