गोंदिया- चंद्रपूर रेल्वेमार्गावर गोंदियाकडून चंद्रपूरकडे जाणाऱ्या ट्रेनच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर घडली. या अगोदर देखील ३ रानडुक्कर व ६ गायींचा याच रेल्वे मार्गावर मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
गोंदियात ट्रेनच्या धडकेत दोन हरणांचा मृत्यू
गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात होती. हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे लाईन पार करत असताना दोन हरिणांना लोकल ट्रेनने धडक दिली. या धडकेत दोन्ही हरणांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही मृत हरणांना गाडण्यात आले आहे.
गोंदिया-चंद्रपूर हा रेल्वे मार्ग नागझिरा अभयारण्यातून जातो. हिरडामाली ते गोंगली रेल्वे स्थानकापर्यंत दाट जंगल परिसर असल्याने अनेकदा जंगली प्राणी जंगलातून या रेल्वे लाईनच्या दुतर्फा ये-जा करत असतात. त्यामुळे ट्रेनच्या धडकेत अनेकदा वन्यजीवांचा मृत्यू होतो. आजही अशीच घटना घडली. गोंदियाकडून चंद्रपूरकडे लोकल ट्रेन जात होती. हिरडामाली-पिंडकेपार दरम्यान रेल्वे लाईन पार करीत असतांना २ हरीणांना लोकल ट्रेनने धडक दिली. या धडकेत दोन्ही हरीणांचा मृत्यू झाला आहे. गोरेगाव वनविभागाने घटनेचा पंचनामा केला असून दोन्ही मृतक हरीणांना गाडण्यात आले आहे. दरम्यान, पिंडकेपार-हिरडामाली रेल्वे मार्गावर रेल्वे लाईनच्या दोन्ही बाजूला तारांचे कंपाउंड करण्याची मागणी अनेकदा वन्य प्रेमींनी व गावकऱ्यांनी केली आहे. कंपाउंड झाले की या रेल्वे मार्गावर कोणतेही वन्यप्राणी किंवा गायी येणार नाहीत व त्यांचा मृत्यू टाळेल. मात्र, याबाबत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
हेही वाचा-नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही गोंदियात मुसळधार पाऊस, २४ तासात गारपीटीचे संकेत