महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा मृत्यू - आमगाव अपघात

गोंदियावरून आमगावकडे येत असताना अग्रवाल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमगावात येथे शोककळा पसरली.

Accident
अपघात

By

Published : May 5, 2020, 10:11 AM IST

गोंदिया -आमगाव नगरपरिषदे अंतर्गत येणाऱ्या किडंगीपार येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. सोमवारी रात्री ही घटना घडली. नारायण श्यामलाल अग्रवाल (वय ४७), दीपक श्यामलाल अग्रवाल (वय ३५) अशी मृत झालेल्या भावांची नावं आहेत.

मृत दीपक श्यामलाल अग्रवाल
मृत नारायण श्यामलाल अग्रवाल

गोंदियावरून आमगावकडे येत असताना अग्रवाल यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ही धडक जोरदार असल्याने दोन्ही भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमगावात येथे शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले. आमगाव पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक काळे करत आहेत

ABOUT THE AUTHOR

...view details