महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक - गोंदिया रानडुक्कर बातमी

वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह दिनकरनगर येथील रमेश गणेश डकुवा यांच्या घरी धाड घातली व त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरुन रानडुकरांचे मांस आढळून आले. त्यानंतर विचारपूस केली असता राम माणिक सिंग याच्याकडून रानडुकरांचे मांस विकत आणल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना मासांसह अटक करण्यात आली.

two arrested with wild boar mutton in gondia
गोंदियात रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक

By

Published : Sep 19, 2020, 10:51 PM IST

गोंदिया - जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील दिनकरनगर येथे रानडुकराच्या मांसासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गोठणगाव वनपरिक्षेत्राधिकारी यांच्या पथकाने केली. रमेश गणेश डकुवा व राम माणिक सिंग (रा.दिनकरनगर), अशी आरोपींची नावे आहेत.

अर्जुनी मोरगाव येथील दिनकरनगर येथे रानडुकराची शिकार करून मांस विक्री केली जात आहे, अशी गुप्त माहिती गोठणगाव वनक्षेत्राधिकारी पाटील यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी वनविभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांसह दिनकरनगर येथील रमेश गणेश डकुवा यांच्या घरी धाड घातली व त्यांच्या राहत्या घराची झडती घेतली. यावेळी त्यांच्या घरुन रानडुकरांचे मांस आढळून आले. त्यानंतर विचारपूस केली असता राम माणिक सिंग याच्याकडून रानडुकरांचे मांस विकत आणल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना मासांसह अटक करण्यात आली. दोघांवर अवैधरित्या रानडुकरांची शिकार करून त्याचे मास विक्री करत असल्या प्रकरणी वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्या प्रमाणे गुन्हा नोद करण्यात आला आहे. पुढील तपास गोठण गाव येथील वनविभाग करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details