गोंदिया -जिल्ह्यातील तिरोडा-तुमसर मार्गावर गुरूवारी संध्याकाळी ट्रक आणि दुचाकीमध्ये जोराची धडक झाली. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला. सेवक बदने (४०) असे मृत्यू पावलेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी ट्रकला आग लावली.
हेही वाचा... चीन, रशिया अन् इराणमध्ये होणार संयुक्त नौदल सराव
मागील एक वर्षापासून तुमसर-गोंदिया या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. कासव गतीने सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामकाजामुळे येथे सातत्याने लहानमोठे अपघात घडत असतात. रस्त्याचे काम चालू असल्याने धुळीचे प्रमाण अधिक आहे, त्यामुळे डोळ्यात धूळ गेल्याने दुचाकीचालकालाही कधीकधी समोरचा रस्ता दिसत नाही. तसेच काम सुरु असूनही मोठ मोठे वाहने लहान वाहनचालकांनी पुढे जाण्यासाठी रस्ता देत नाहीत. त्यामुळे असे अनेक अपघात होतात. मात्र, तरीही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे.