गोंदिया- संपूर्ण देशात कोरोनाची धास्ती असताना राज्य सरकारने राज्यात कलम 144 लागू केली असुन संचारबंदी सुद्धा केली आहे. तसेच जीवनाश्यक वस्तू वगळता इतर सर्व दुकाने बंद करण्यात आले आहे. मात्र, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमधून तुरीखाली देशी दारूचे 70 बॉक्स लपवून वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टरचालकास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
संचारबंदी : तूरीखाली अवैधरित्या दारु वाहतूक करणारा ताब्यात, ट्रॅक्टर अन ट्रॉली जप्त - दारु
संचारबंदीच्या काळा तुरीखाली दारू वाहतूक करणाऱ्याला ताब्यात घेण्यात आले असून ट्रॅक्टर, ट्रॉलीसह मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे.
जप्त मुद्देमाल
अर्जुनी मोरगाव तालुक्यातून भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात अवैधरित्या दारू ट्रॅक्टरमधून वाहतूक सुरू होती. याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर त्यांनी ट्रॅक्टरचालक श्रीराम परशुरामकर यास मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे.
हेही वाचा -जनता कर्फ्यू : गोंदियात वृत्तपत्र विक्रेत्याकडून सुरुवात....