कोरोनावर मात करणाऱ्यांनी गाठले अर्धशतक, तर 19 जणांवर उपचार सुरू
गोंदिया जिल्ह्यात तीन दिवसांपासून आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणात असलेले बाधित रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी जात आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 50 वर पोहचली आहे.
गोंदिया -जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे. तसेच रुग्णांच्या बरे होण्याबाबतीत जिल्हावासियांची चिंता थोड़ी कमी झाली आहे. आतापर्यंत 50 जण कोरोनामुक्त झाले असून, ते आपल्या घरी परतले आहेत.
गुरुवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्याची कोरोनाबाधितांची संख्या 69 वर गेली आहे. यात 50 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. तर 19 रुग्ण अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाचे कोरोनाबाबतचे कामकाज समाधानी असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.
जिल्ह्यात तीन दिवसांपासून आरोग्य यंत्रणेच्या नियंत्रणात असलेले बाधित रूग्ण कोरोनामुक्त होवून घरी जात आहेत. त्यामुळे एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 50 वर पोहचली आहे. तर दुसरीकडे आज (गुरुवारी) एकही नविन कोरोना बाधित रूग्ण आढळला नाही. तर 2 जण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बाधितांची संख्या 69 वर कायम आहे. तर जिल्हा सामान्य रूग्णालयात 19 सक्रीय बाधित उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात पहिला रुग्ण 25 मार्च रोजी आढळला होता. मात्र, तो रुग्ण 10 एप्रिल रोजी बरा होऊन घरी परतला. त्यानंतर सतत 39 दिवस एकही रुग्ण बाधित आढळला नाही. मात्र, 19 मेपासून जिल्ह्यात सतत कोरोना विषाणू संसर्ग वाढत चालला आहे. त्यात बरे होनार्यांचे प्रमाण बरे असल्याने ही बाब जिल्हावासियांसाठी दिलासादायक आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून आतापर्यंत 1036 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यातून 69 जण पॉझिटिव्ह आढळले. तर 961 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला. तसेच 6 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.