गोंदिया - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यातील नक्षलवादी अर्जुनी-मोरेगान या भागाचा दौऱयासाठी रवाना झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांची सुरक्षा दुपटीने वाढविण्यात आली आहे.
भाजपची महाजनादेश यात्रा नक्षलग्रस्त भागात, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेत दुपटीने वाढ - gondia
मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरेगाव या भागाचा दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. त्यानिमित्ताने त्यांची सुरक्षा दुपटीने वाढविण्यात आली आहे.
मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने नक्षलवादी भागात, सुरक्षा दुपटीने वाढविली
आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाजनादेश यात्रा १ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आली. या यात्रेच्या चौथ्या दिवशी आज (रविवार) मुख्यमंत्री हे नक्षलग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी अर्जुनी-मोरगावकडे रवाना झाले आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या सुरक्षेत दुपटीने वाढ करण्यात आली आहे. भाजपच्या या महाजनादेश यात्रेचा समारोप ३१ ऑगस्ट रोजी होणार आहे.
Last Updated : Aug 4, 2019, 2:51 PM IST