महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तिरोडा पोलिसांची अवैध दारू अड्ड्यांवर धाड; 4 जणांवर गुन्हे दाखल - Tiroda police action

गोपनीय माहितीच्या आधारावर आज तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डात चार ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर धाड मारली. यात तब्बल 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत चार आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चारही आरोपी तिरोड्याच्या संत रविदास वॉर्डातील रहिवासी आहेत.

Liquor shop raids Gondia
मोहफूल दारू अड्डा धाड गोंदिया

By

Published : Jan 13, 2021, 9:56 PM IST

गोंदिया - गोपनीय माहितीच्या आधारावर आज तिरोडा पोलिसांनी संत रविदास वॉर्डात चार ठिकाणी अवैध दारू अड्ड्यांवर धाड मारली. यात तब्बल 4.80 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाईत चार आरोपींवर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, चारही आरोपी तिरोड्याच्या संत रविदास वॉर्डातील रहिवासी आहेत.

Liquor shop raids Gondia

हेही वाचा -गोंदियात तीन केंद्रांवर कोरोना लसीकरणाचा 'ड्राय रन'

कारवाईत शामराव श्रीराम झाडे (वय 45) याच्याकडून 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचा 75 प्लास्टीक पोतींमध्ये 1 हजार 500 किलो सडवा मोहफुल रसायन जप्त करण्यात आला. पूर्णाबाई प्रल्हाद तांडेकर (वय 45) हिच्याकडून 1 लाख 12 हजार रुपये किंमतीचा 70 प्लास्टीक पोतींमध्ये 1 हजार 400 किलो सडवा मोहफुल रसायन, सूरज प्रकाश बरियेकर (वय 35) याच्याकडून 1 लाख 44 हजार रुपये किंमतीचा 90 प्लास्टीक पोतींमध्ये 1 हजार 800 किलो सडवा मोहफूल रसायन व संतोष रमेश बरियेकर (वय 40) याच्याकडून 1 लाख 4 हजार रुपये किंमतीचा 65 प्लास्टीक पोतींमध्ये 1 हजार 300 किलो सडवा मोहफुल रसायन जप्त करण्यात आला.

सदर माल घटनास्थळी नष्ट करून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक योगेश पारधी व त्यांच्या अधिनस्त पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हणवते, एएसआय जांभूळकर, पोलीस हवालदार चेतुले, नायक पोलीस शिपाई बर्वे, बांते, महालगावे, कटरे, पोलीस शिपाई सव्वालाखे, प्रशांत कहालकर, म.पो.शि बावनथडे यांनी केली.

हेही वाचा -गोंदियाच्या मुख्य चौकांमध्ये लागणार थकीत कर दात्यांची यादी

ABOUT THE AUTHOR

...view details