गोंदिया - जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील धोबीसराड नाला येथील गुरांसाठी चारा आणायला गेलेली पाच मुले नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना आज (बुधवार ) सकाळी घडली. गावालगत असलेल्या नाल्यानजिक गावातील पाच तरुण गाईचा चारा आणण्याकरिता गेले होते. तर चारा हा नाल्यापलीकडे असल्यामुळे नाला पार करण्याचा प्रयत्न या पाचही युवकांनी केला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे युवक नाल्यातील पाण्यात वाहू लागले.
गोंदिया : चारा आणण्यासाठी गेलेले तीन तरुण नाल्याच्या पाण्यात गेले वाहून - गोंदियात तीन तरुण नाल्यात गेले वाहून
गुरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या पाच तरुणांपैकी तीन तरुण नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यामधील धोबीसराड नाला येथे घडली. दोन तरुणांना वाचण्यात स्थानिकांना यश आले आहे. तर तीन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
गोंदियात तीन तरुण नाल्याच्या पाण्यात गेले वाहून
या तरुणांचा आरडाओरडा ऐकून जवळच असलेल्या काही युवकांनी नाल्यात पोहत जाऊन या पाचपैकी दोघांना बचावले तर पाण्याचा वेग जास्त असल्याने इतर तीन युवक यात वाहून गेले. 3 मुलांचे शोधकार्य सुरू करण्यात आले. काही तासातच बचाव पथकाने तीन जणांचे मृतदेह बाहेर काढले. सावन पसीताराम पटले (22 वर्ष), अतुल माणिकचंद ठाकुर (15 वर्ष) व संदीप सोमराज कटरे (22 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. तर आदित्य गौतम (15 वर्ष) व राहुल पटले (वय 18) अशी बचावलेल्या मुलांची नावे आहेत.
Last Updated : Sep 24, 2020, 7:00 AM IST