गोंदिया -जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता तिरोडा वनपरिक्षेत्रातील किडंगीपार जवळी एका शेत शिवाऱ्यात असलेल्या विहिरीत बिबट्यासह तीन रानडुकरे मृतावस्थेत आढळून आले ( Gondia Leopard And Pigs Death ) आहेत. वनविभागाने त्या वन्यप्राण्यांचे मृतदेह विहिरीतून काढत शवविच्छेदन करुन त्यांचा अंतविधी केला आहे.
सविस्तर माहिती अशी की, किडंगीपार येथील रहिवासी हरिचंद दादूजी तुरकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत एक बिबट्या व तीन रानडुक्कर मृतावस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. त्यानुसार वन परिक्षेत्र अधिकारी एस. के. एकरे, क्षेत्र सहाय्यक एस. जी. पारधी, बीट गार्ड महेंद्र सूर्यवंशी व वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. घटनेची माहिती वनसंरक्षक व सहायक वनसंरक्षक यांनाही देण्यात आली आहे. त्यानंतर मृत बिबट्या व तीन डुकरांना बाहेर काढण्यात ( Gondia Leopard And Pigs Death ) आले.