गोंदिया - देवरी तहसील अंतर्गत येणाऱ्या घोनाडी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका गोंदियावरुन औषध घेऊन दवरीकडे जात होती. यावेळी अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने रुग्णवाहिका गोंदिया गोरेगाव रस्त्यावर कारंजा- ढीमरटोली मार्गावर असलेल्या नाल्यात कोसळली.
रुग्णवाहिका नाल्यात कोसळल्याने तीनजण जखमी - रुग्णवाहिकेचा अपघात
रुग्णवाहिका नाल्यात कोसळल्याने तीनजण जखमी झाले. हा अपघात चालकाचे रुग्णवाहिकेवरील नियंत्रण सुटल्यामुळे झाला.
ही घटना २० मे रोजी सायंकाळी ५च्या दरम्यान घडली, या घटनेत रुग्णवाहिकेत बसलेले तीन लोक जखमी झाले. ज्यामध्ये रुग्णवाहिका चालक मंगेश हिंगे, बलिराम हेला व एका महिलेचा समावेश आहे. तिन्ही जखमींना गोंदिया मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घानोडी प्राथमिक आरोग्य केंद्रची रुग्णवाहिका (क्र. एम एच -३५/डी-२८९) औषध घेण्यासाठी गोंदियाला गेली होती. औषध घेऊन गोंदियावरून घोणाडी देवरीकडे गोंदिया गोरेगाव मार्गाने जात असताना रुग्णवाहिका चालकाचे नियंत्रण सुटले. रुग्णवाहिका नाल्यात जाऊन कोसळली.