महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बिबट्याची कातळी विकणाऱ्या तिघांना अटक; गोंदिया येथील घटना

भंडारा जिल्ह्यातील तीन जण बिबट्याची कातळी विकण्यासाठी गोंदियात आले असल्याची माहिती नावेगावबांध पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली आहे.

three-person-arrested-for-selling-leopard-skins-in-gondia
बिबट्याची कातळी विकणाऱ्या तिघांना अटक; गोंदिया येथील घटना

By

Published : Nov 20, 2020, 4:11 AM IST

गोंदिया -पाच लाख रुपये किंमतीची बिबट्याची कातळी विकण्यासाठी भंडाऱ्यातील तीन व्यक्ती गोंदिया जिल्ह्यात आले असल्याची गुप्त माहिती नवेगावबांध पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारावर पोलिसांनी सापळा रचत या तीनही व्यक्तींना अटक केली आहे. देविदास दागो मरस्कोल्हे (52) रा. झाडगाव, मंगेश केशव गायधने (44) रा. पोहरा व रजनीस पुरुषोत्तम पोगडे (32) रा. सानगडी, असे अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींची नावे आहे. हे सर्व आरोपी भंडारा जिल्ह्यातील असून त्यांच्याकडून बिबट्याची कातडी, काळीज, गुडधा, दात, पंजे असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे यांची प्रतिक्रिया

18 नोव्हेंबरा रोजी भंडारा जिल्ह्यातील तीन जण बिबट्याची कातळी विकण्यासाठी गोंदियात आले असल्याची माहिती नावेगावबांध पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एक बनावट ग्राहक तयार करून बिबट्याची कातडी पाच लाख रुपयांत खरेदी करण्याची बोलणी केली. खरेदीची बोलणी संपताच पोलिसांनी छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. त्याच्या जवळून बिबट्याची कातडी, काळीज, गुडघा, दात, पंजे हे अवयव जप्त करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी या तीनही आरोपींवर वन्य प्राणी संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेच हे प्रकरण प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयाकडे सोपविले आहे.

हेही वाचा- एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण; आधी कन्येलाही झाला होता संसर्ग

ABOUT THE AUTHOR

...view details