महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोदिंयात दारू तस्करी करणाऱ्या तिघांना अटक - पोलीस

गोंदिया-बल्लारशहा गाडीत कपड्यांच्या आत सेलोटेपने शरीराला दारू चिटकवून रेल्वेने दारू तस्करी करणाऱ्या ३ आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ११ हजाराच्या २१४ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यातआल्या आहेत.

दारू तस्कर

By

Published : Feb 17, 2019, 3:28 PM IST

गोंदिया - कपड्यांच्या आत सेलोटेपने शरीराला दारू चिटकवून रेल्वेने दारू तस्करी करणाऱ्या ३ आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. परवेज खान (२७), राहुल कोमरे (३०), जयदेव दोनाडकर, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

गोंदिया रेल्वेस्थानक

गोंदिया-बल्लारशहा गाडीतून कपड्यांच्या आत सेलोटेपने शरीराला दारू चिटकवून ३ आरोपी दारुची तस्करी करत होते. बंदी असलेल्या गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यात हा प्रकार घडल्यामुळे गोंदिया रेल्वे पोलिसांनी या आरोपींना अटक केली. तसेच त्यांच्याकडील १० हजार ७०० रुपये किमतीच्या २१४ देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.

सर्व आरोपी नागभीडवरून रेल्वेत चढले. वेशभूषा केलेल्या पोलिसांना त्यांच्या हालचालींवर संशय आल्यावर त्यांनी या आरोपींची तपासणी केली. यावेळी आरोपींनी शरीराला सेलोटेपच्या साहाय्याने देशी दारुच्या बाटल्या चिटकवलेल्या आढळल्या. त्यांच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला गेला आहे. पुढील तपास गोंदिया रेल्वे पोलीस करत आहेत.


Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details