गोंदिया -जिल्ह्यात ओबीसी समाजासह एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती, जमातींसह अल्पसंख्याक समाजाकडून विविध मागण्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात संविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, आदिवासी एम्पलाईज संघटन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी गोंदियात 'जनआक्रोश' आंदोलन - undefined
गोंदियात ओबीसी समाजासह एससी, एसटी, भटक्या विमुक्त जाती, जमातींसह अल्पसंख्याक समाजाकडून विविध मुद्यांसाठी जनआक्रोश आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवासंघ, आदिवासी एम्पलाईज संघटन आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.
ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, ओबीसींचे नोकरीतील बँकलाग भरण्यात यावे, ओबीसी विद्यार्थ्यांना वसतीगृहासह सर्व सुविधा देण्यात याव्या, १९९६ चा पेसा कायदा, २००६ चा वनाधिकार कायदा, १९९९ चा एससी एसटी अत्याचार कायदे कार्यान्वित करण्यात यावे, डॉ. पायल तडवी प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा देण्यात यावी, ईव्हीएम मतदान पद्धती बंद करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. तसेच सेव मेरिट सेव्ह नेशनच्या नावावर आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने प्रचार करत असल्याच्या मुद्दा यावेळ मांडण्यात आला.
'लोकशाही वाचवा..सविधान वाचवा', 'ईव्हीएम हटवा..लोकशाही वाचवा', अशा घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या. इंदिरा गांधी स्टेडियम येथून काढण्यात आलेली ही जनआक्रोश रॅली गोरेलाल चौक, शहर पोलीस स्टेशन, गांधी प्रतिमा, जय स्तंभ चौक, आंबेडकर चौक, नेहरू चौकातून शहरभर फिरवण्यात आली. रॅलीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
TAGGED:
andolan