गोंदिया - आमगावातील लोकांनी श्रावण सोमवारनिमित्त वाघनदीच्या पात्रातील पाण्याचा महादेवाला अभिषेक केला. यावेळी निघालेल्या कावड यात्रेमध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी स्त्री-पुरुष व बालकांनी नदी पात्रातून कावडीमध्ये आणलेले जल घेऊन नगर भ्रमण केले. भाविकांनी 'बम-बम भोले' चा गजर करीत काढलेल्या यात्रेने नगर दणाणून गेले होते.
'बम-बम भोले' च्या गजरात दुमदुमली आमगाव नगरी, कावड यात्रेत हजारो कावड्यांनी घेतला सहभाग - 'बम-बम भोले'
आमगावातील लोकांनी श्रावण सोमवारनिमित्त वाघनदीच्या पात्रातील पाण्याचा महादेवाला अभिषेक केला. यावेळी निघालेल्या कावड यात्रेमध्ये भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भाविकांनी 'बम-बम भोले' चा गजर करीत काढलेल्या यात्रेने नगर दणाणून गेले होते.

thousands of devotees participated in kanwar yatra in gondia
या कावड यात्रेचे नटराज मंडळ अष्टविनायक परिवार तसेच विविध मंडळांनी पुष्प आणि भोग यांचे वितरण करून स्वागत केले. कावड यात्रा शहरातील विविध मार्गाने भ्रमण करीत महादेव पहाडी येथे पोहचली, तेथील शिवशंकराच्या मंदिरात शंकराच्या मूर्तीवर जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली. ही कावड यात्रा, गेली १४ वर्षे संस्कार गृपतर्फे आयोजित करण्यात येत आहे.