महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत - मूर्ती घडवण्याची मूर्तिकारांची लगबग

हिंदू धर्मात मूर्तीपुजेला महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिना सुरू झाला की, जन्माष्टमी, गौरी पूजन, गणपती निमित्ताने मूर्तींना मोठी मागणी असते. परंतु, देवाच्या मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांना कष्ट उपसत जीवन जगावे लागत आहे, अशी खंत गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली.

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत

By

Published : Aug 21, 2019, 6:03 PM IST

गोंदिया -जन्माष्टमीचा सण दोन दिवसावर येऊन ठेपला आहे. याच पार्श्वभूमीवर कृष्णाच्या मूर्ती घडवण्याची मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. कृष्ण जयंतीला कृष्णाच्या मूर्तीची स्थापना केली जाते.

महागाईमुळे मूर्तिकारांना मिळेना कष्टाचा पुरेसा मोबदला; गोंदियातील मूर्तिकारांनी व्यक्त केली खंत
सध्या मूर्तिकार मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात व्यग्र असून या कामासाठी मूर्तीकारांचे संपूर्ण कुटुंब काम करत आहे. मात्र, कष्ट आणि महागाईच्या तुलनेत पुरेसा मोबदला मिळत नसल्याने मूर्तिकारांनी नाराजी व्यक्त केली आहे. हिंदू धर्मात मूर्तीपुजेला महत्त्वाचे स्थान आहे. श्रावण महिना सुरू झाला की, जन्माष्टमी, गौरी पूजन, गणपती निमित्ताने मूर्तींना मोठी मागणी असते. परंतु, देवाच्या मूर्ती घडवणाऱ्या कारागिरांना कष्ट उपसत जीवन जगावे लागत आहे. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कुंभार समाज आहे. मातीपासून तयार भांडी तयार करणे, हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. काळाच्या ओघात मूर्तीकलेचा व्यवसाय हा फक्त विशिष्ट समाजापुरता मर्यादित राहिला नाही. तरी सुद्धा कुंभाराच्या अंगी ही कला उपजत असते. त्याच जोरावर आजही मूर्ती कामात हा समाज आपली ओळख टिकवून आहे. मूर्तिकार आपले संपूर्ण कुटुंब घेऊन गोंदिया येथे भाड्याच्या जागेवर येऊन मूर्ती बनवण्याचा व्यवसाय करतात. मात्र, पिढ्यानपिढ्या हा काम करणारा कुंभार मात्र कुठेतरी हरवत चाललेला आहे. मूर्ती तयार करणे हे काम मेहनतीचे आहे, परंतु जो मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही. हा व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी या कुटुंबांची धडपड सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details