गोंदिया: गोंदिया तालुक्यातील नवरगाव येथील रहिवासी असलेली वर्षा 4 वर्षा पासून शिक्षणाकरिता गोंदिया येथील आदिवासी मुलीच्या वस्तिगृहात राहत होती. रात्री वर्षा आपला मैत्रीनी सोबत वाढदिवस सेलिब्रेट करत झोपी गेली. आजची नवीन पहाट नवचैतन्य घेऊन येईल अशी आशा बाळगत सकाळी वर्षाच्या मैत्रीनी पेपर देण्यासाठी कॉलेजला गेल्या. तीने सकाळी वडिलांना फोन करून मोबाईल रिचार्ज घालायला सांगितले. असे बोलणे झाल्याचे मृतक वर्षाच्या वडिलाने सांगितले.
Girls Suicide: वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी मुलीची वसतीगृहातच आत्महत्या - आदिवासी मुलीचे वस्तिगृह
वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी (on the second day of her birthday ) 19 वर्षीय मुलीने स्वत:च्या वस्तिगृहाच्या पंख्याला ओढणीने गळफांस घेत (girl committed suicide in the hostel ) आत्महत्या केल्याची घटना गोंदिया शहरातील मामा चौक येथील आदिवासी मुलीच्या वस्तिगृहात (Tribal girls hostel) घडली आहे. वर्षा कुवरलाल मसे वय 19 वर्ष असे मृतक मुलीचे नाव आहे. वर्षा ने आत्महत्या का केली याचे कारण सध्या अस्पष्ठ आहे,
तिच्या रूम च्या मैत्रीने परत वस्तिगृहात आल्यावर रूम चा दरवाजा ठोठावला तरी वर्षाने दरवाजा उघडला नाही. अखेर वार्डनच्या सहाय्याने दरवाजा तोडला असता ती गळफांस घेतलेल्या स्थितीत दिसली. याची माहिती पोलिसांना व वर्षाच्या कुटुंबाला दिली गेली. घटना स्थळ गाठत कुटुंबाने एकच हंबरडा फोडला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत तपासणीसाठी शवविच्छेदन करिता, गोंदिया शासकीय रुग्णालयात पाठविन्यात आला. शहर पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्षाच्या मृत्यु मुळे नवरगावात येथे शोककळा पसरली आहे.