गोंदिया- गोरेगाव येथील तहसीलदार शेखर पुनसे यांना ५० हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरून अटक केली आहे. काल (शनिवारी) सकाळी ९ वाजेच्या सुमारास लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. लाच घेतल्या प्रकरणी पुनसे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात; ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले - acb gondia
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (शनिवारी) सकाळी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारतना तहसीलदार शेखर पुनसेला रंगेहाथ अटक केली. दरम्यान, तहसीलदार शेखर पुनसे यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोरेगाव तालुक्यातील हौसीटोला या गावी तलाव खोलीकरण काम सुरू होते. तक्रारदाराने या कामातील गौण खनीज विना परवानगीने काढल्याने तलाठी यांनी मनाई करीत तहसीलदार शेखर पुनसे यांना तक्रार करून याबाबत माहिती दिली. त्यावर तहसीलदार यांनी हौसीटोला येथे खोलीकरण सुरू असलेल्या ठिकाणी भेट देवून गौण खनीज खोदकामाचे मोजमाप केले व १२ लाख रुपयाचे दंडाचे नोटीस तक्रारदारास पाठविले. मात्र, तडजोड म्हणून दंडाऐवजी ५० हजार रुपये देण्याचे ठरले होते. मात्र, तक्रारदाराला ५० हजार रुपये लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला तक्रार केली. शहानिशा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल (शनिवारी) सकाळी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये स्वीकारतना तहसीलदार शेखर पुनसेला रंगेहाथ अटक केली. दरम्यान, तहसीलदार शेखर पुनसे यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदार शेखर पुनसे यांच्या विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा-जन्माच्या तीन तासात तीनदा बदलले बाळाचे रक्त, 'एक्सचेंज ट्रान्सफ्यूजन'चा जिल्ह्यातील पहिला प्रयोग