गोंदिया- प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज धरणे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात आले.
शिक्षक संघाचे धरणे आंदोलन हेही वाचा-गोंदियात ३३ किलोचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई
सहाव्या वेतन आयोगाचे पाचही हप्ते जी.पी.एफमध्ये जमा करावे. १५०० प्रोत्साहन भत्ता विनाअट सर्वांना देण्यात यावा, अतिरिक्त घरभाडे लागू करण्यात यावे, केंद्रप्रमुखाच्या रिक्त जागा भराव्यात, सेवा निवृत्त शिक्षकांकडून वसूल करण्यात आलेली संगणक अर्हता प्राप्त न केल्याबाबतची वसुली परत करावी, देय रजा मंजूर करून तीन दिवसांचे वेतन देण्यात यावे, गणित विषय शिक्षकांच्या जागा भराव्यात, अप्रशिक्षीत शिक्षण सेवकांची शिक्षण सेवक पदावर व्यथित कालावधी वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरावा, शालेय विद्युत देयक ग्राम पंचायतीकडून भरण्यात यावे, प्राथमिक शिक्षकांना सामूहिक विम्यात समाविष्ट करावे, शाळांना ४ टक्के सादिल अनुदान देण्यात यावे, सडक अर्जुनी पंचायत समितीत जीपीएल आणि एलआयसीची अपहार झालेली रक्कम शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
हेही वाचा-गोंदियातील इटीयाडोह धरण 6 वर्षानंतर पहिल्यांदाच ओव्हरफ्लो..!
दरम्यान, संघटनेचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी यावेळी शासनाच्या आणि कर्मचारी विरोधी धोरणावर कडाडून प्रहार करण्यात आला. शासनाने शिक्षकांचा अंत पाहू नये, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.