महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अचानक आलेल्या वाऱ्यामुळे उपोषणकर्त्यांच्या अंगावर पडला मंडप, गोंदियातील घटना - कार्यवाहीसाठी

गोंदियातील खासगी शाळांमधील मनमानी कारभाराविरोधात एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू असताना अचानक वादळ आले. या वाऱ्यामुळे उपोषण स्थळी असलेला मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळला.

आमरण उपोषण

By

Published : Jun 8, 2019, 11:50 AM IST

गोंदिया- खासगी शाळांमध्ये दरवर्षी शालेय शुल्कामध्ये वाढ होत आहे. शिक्षक मंडळाने ठरवून दिलेल्या नियमांना तुडवून येथील खासगी शाळांचे संचालक मनमानी कारभार चालवितात. याच्या निषेधार्थ प्रशासकीय इमारतीसमोर आमरण उपोषण सुरू असताना अचानक वादळ आले. या वाऱ्यामुळे उपोषण स्थळी असलेला मंडप आंदोलकांच्या अंगावर कोसळला.

वादळात उपोषण स्थळावरचा मंडपाची अशी अवस्था झाली
गोंदियातील खासगी शाळांमधील मनमानी कारभाराविरोधात एन.एस.यु.आय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. खासगी शाळांकडून अवाढव्य प्रवेश फी, शिक्षण शुल्क, गणवेश व पुस्तकांसाठी पालकांची पिळवणूक सुरु आहे. या मनमानी कारभाराकडे शिक्षण विभागाचेही दुर्लक्ष सुरु आहे. शिक्षणाधिकाऱयांनी अशा शाळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच केली होती. त्यावेळी कारवाईसाठी शिक्षणाधिकाऱयांनी सहा दिवसांची मुदत मागितली होती. मात्र आठ महिन्यांपासून हा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे एनएसआय चे जिल्हाध्यक्ष हरीश तुळसकर यांनी गुरुवार पासून आमरण उपोषण सुरु केले.आमरण उपोषण सुरु असताना अचानक वादळ सुरु झाले. यावेळी मंडपात शासनाच्या निषेधार्थ भजन सुरु होते. अचानक आलेल्या वाऱ्यामुळे आंदोलकांचा उपोषण स्थळावरील मंडळ कोसळले. तर काही आंदोलक पुरुष महिलांनी मंडपाच्या खांबांचा सहारा घेतला.

ABOUT THE AUTHOR

...view details