गोंदिया - नदीवर आंघोळ करण्यासाठी मित्राबरोबर गेलेल्या एका युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर येथे ध्रुव उजवनकर (वय २१ रा. नागपूर ) असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात बीएसस्सीचे शिक्षण घेत होता.
गोंदियात नदीवर आंघोळ करण्यासाठी गेलेल्या युवकाचा वाघ नदीत बुडून मृत्यू - गोंदिया
नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ध्रुव उजवनकर असे नदीत बडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो देवरी येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयातील बीएसस्सी भाग १ चा विद्यार्थी आहे.

नदीतून ध्रुवचा मृतदेह बाहेर काढताना गावकरी
ध्रुव नदीत अंघोळ करत असताना खोल पाण्यात गेला होता. यावेळी त्याचा तोल जाऊन बुडून मृत्यू झाला. परिसरातील गावकऱ्यांच्या मदतीने ध्रुवचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला. घटनेची नोंद देवरी पोलिसांनी केली आहे. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून तरुण पोरगा गेल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.