गोंदिया - सध्याच्या घडीला गोंदिया जिल्ह्याचा तापमानात वाढ झाली आहे. या तापमानाने अनेक छोटे तळे, नाले, नदी मधील पाणी आटलेला आहे, गोंदिया जिल्ह्याचा वैभव अशी ओळख असलेला सारस पक्ष्यांवर संकट निर्माण झाले असून या पक्ष्यांवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. मात्र ज्या परिसरात सारस पक्ष्यांसाचा अधिवास आहे, त्या परिसरातील शेतकरी मोटर पंप, बोरवेलच्या सायनाने पाण्याची सोय करून तहानलेल्या सारस पक्ष्यांची तहान भागाचे कार्य करत आहेत. जिल्ह्याचे वैभव अशी ओळख असलेला तसेच शेतकऱ्याचा मित्र सारस पक्षी संपूर्ण महारष्ट्र मध्ये गोंदिया जिल्ह्यात आढळतो. त्यामुळे मागील काही वर्ष पासुन सारस पक्ष्यांची संख्या कमी होत. चाललेली असल्याने नागपूर न्यायालयाने गोंदिया जिल्हा अधिकारी यांना सारस संवर्धन करण्याचे आदेश दिले.
पाण्यासाठी 'सारस'चीही भटकंती, तहानलेल्या पक्ष्यांची शेतकऱ्यांनी भागवली तहान - गोंदिया तापमान वाढ बातमी
गोंदिया जिल्ह्याचे वैभव तसेच प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणारा आणि शेतकऱ्याचा मित्र अशी ओळख असणारा सारस पक्षी हा संपूर्ण महाराष्ट्र फक्त गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळतो. मात्र हा पक्षी आत दुर्मिळ होत चाललेला आहे. मागील काही वर्षा पासून काही सामाजिक संस्था यांच्या जोपासण्या साठी व त्यांच्या संख्येत वाढ होण्या साठी. समोर आल्या मात्र प्रशासन कडू या पक्ष्यां करिता कोंत्याही प्रकारची तरतूद किंवा दखल घेण्यात आली नाही. परंतु उच्च न्यायालयाने दखल घेतली आशु गोंदिया प्रशासनाला सारस पक्ष्यांचा संवर्धन करण्याचे आदेश देखिली दिले होते.
शेतकऱ्याचा मित्र अशी ओळख -गोंदिया जिल्ह्याचा वैभव तसेच प्रेमाचे प्रतीक समजल्या जाणारा आणि शेतकऱ्याचा मित्र अशी ओळख असणारा सारस पक्षी हा संपूर्ण महाराष्ट्र फक्त गोंदिया जिल्ह्यात पाहायला मिळतो. मात्र हा पक्षी आत दुर्मिळ होत चाललेला आहे. मागील काही वर्षा पासून काही सामाजिक संस्था यांच्या जोपासण्या साठी व त्यांच्या संख्येत वाढ होण्या साठी. समोर आल्या मात्र प्रशासन कडू या पक्ष्यां करिता कोंत्याही प्रकारची तरतूद किंवा दखल घेण्यात आली नाही. परंतु उच्च न्यायालयाने दखल घेतली आशु गोंदिया प्रशासनाला सारस पक्ष्यांचा संवर्धन करण्याचे आदेश देखिली दिले होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाला कुठे तरी जिल्हा प्रशाषण गंभीर रित्या घेत नसल्याचे दिसत आहे. आजच्या घडीला सारस पक्ष्याला पाण्याची गरज असल्याने त्या करिता पाणवठे बनविण्याची गरज आहे. मात्र जिल्हा प्रशासना कडून अद्याप अशी कोणतीही उपायोजना करण्यात आली नाहीं. जेव्हा एखाद्या सारस पक्ष्याचे पाण्या अभावी मृत्यू होणार तेव्हा जिल्हा प्रशासन जागे होणार का असा प्रश्न पक्षी प्रेमींना पडत आहे.
एकंदरीत उन्हाळा लागताच पाण्याची पातळी कमी होत चालली असून मानवी लोकवस्तीच्या मध्ये सुध्दा पाण्याच्ये स्त्रोत कामी होत आहे. त्यामुळे जंगल, गावासेजारी असलेल्या तलाव पुर्णतः आटले आहे. त्यामुळे वन्य प्राणी तसेच सारस पक्षी देखील पाण्यासाठी भटकंती करत आहेत. हेच बघता ज्या परिसरतील या सारस पक्ष्यांचा सहवास आहे त्या परिसरातील शेतकरी आपल्या शेताच्या परिसरात सारस पक्षांसाठी आपल्या मोटर पंप, बोरवेल द्वारे तहानलेल्या सारस पक्षांसाठी पाण्याची सोय करून देत आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले -गोंदिया जिल्ह्यातून दुर्मिळ सारस पक्षी दिवसेंदिवस नामशेष होत चालला आहे. त्याच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठाने २२ डिसेंबर २०२१ ला राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले, तसेच हा सार्वजनिक हिताचा विषय आहे. त्यामुळे याकडे अतिशय गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे, अशी समजही दिली. उच्च न्यायालयाने दुर्मिळ सारस पक्ष्याचे संवर्धन व संरक्षणाकरिता जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमुर्तीव्दय सुनील शुक्रे व अनिल पानसरे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, याचिकेचे कामकाज पाहणा-या अॅड. राधिका बजाज यांनी राज्य सरकारच्या उदासीनतेकडे लक्ष वेधले होते. न्यायालयाने संबंधित सरकारी अधिका-यांना १५ सप्टेंबर २०२१ रोजी नोटीस जारी करून यावर उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले होते. उत्तर सादर केलेल्या नंतर उच्च न्यायालयाने गोंदिया जिल्हाधिकारी, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), वनसंरक्षक, उपवनसंरक्षक व पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सारस संवर्धन कण्याचे आदेश दिले मात्र कुठे तरी जिल्हा प्रशासन सारस पक्ष्यांच्या संवर्धना कडे दुर्लक्ष करीत असल्याचे सारस पक्षी प्रेमी बोलत असल्याची चर्चा आहे.
गोंदिया जिल्ह्यात सध्या ३९ सारस -संपूर्ण महाराष्ट्रात गोंदिया जिल्ह्यात सारस पक्षी पाहायला मिळतो. मात्र, सारस पक्ष्यांचा मृत्यू संख्येत वाढ होत चाललेली असल्याने सध्याच्या घडीला फक्त ३९ सारस पक्षी आहेत. मागील २००४-२००५ मध्ये ६ सारस पक्ष्यांची गणना करण्यात आली होती त्या नंतर वर्ष २००६-२००७ मध्ये २२, २००८-२००९ मध्ये ३८, २०१०-२०११ मध्ये ४५, २०११-२०१२ मध्ये ५२, २०१२-२०१३ मध्ये ३५, २०१४-२०१५ मध्ये ३८, २०१५-२०१६ मध्ये ३५, २०१६-२०१७ मध्ये ३७, २०१७-२०१८ मध्यें ३५, २०१८-२०१९ मध्ये ३८, २०१९-२०२० मध्ये ४५ सध्या च्या घडीला ३९ सारस पक्षी आहेत.