महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्टील कंपनी दुर्घटना; दोन मजुरांचा नागपुरात उपचारादरम्यान मृत्यू

स्टील कंपनीमध्ये वितळवलेल्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने ७ कामगार होरपळले. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी घडली होती. जखमींपैकी बिरबल चौबे व परवेज या दोघांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

स्टील कंपनी दुर्घटना

By

Published : Nov 7, 2019, 11:51 PM IST

गोंदिया - देवरी एमआयडीसीतील स्टील कंपनीमध्ये वितळवलेल्या लोखंडाचे द्रव अंगावर पडल्याने ७ कामगार होरपळले. ही घटना ३१ ऑक्टोबरला दुपारी घडली होती. जखमींपैकी बिरबल चौबे व परवेज या दोघांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अजित सोनटक्के, सुनीलकुमार राम, एम. यादव, मोहम्मद अन्सारी कुर्बान अंसारी (रा. रोहतास ससरम, बिहार) असे भाजलेल्या अन्य कामगारांची नावे आहेत.

कमलेश बच्छाव, पोलीस निरीक्षक, देवरी

हेही वाचा -गोंदियात गटविकास अधिकाऱ्याला ५० हजारांची लाच घेताना एसीबीने केली अटक

दोन महिन्यांपूर्वीच प्राझीया दुलिओ लाईफस्टाईल प्रायवेट लिमिटेड कंपनीच्या स्टील फॅक्टरीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता फॅक्टरीमध्ये लोखंड वितळवण्याचे काम चालू असताना 'लँडर महयोगॅस' तयार झाल्याने, मेटलला ऊकळी येऊन कामगारांच्या अंगावर लोखंडाचे द्रव पडले. यात ७ कामगार भाजले. सर्व जखमींना देवरी येथील ग्रामीण रुग्णालयातून भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, पुन्हा त्यांना तेथून नागपूर येथे उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान बिरबल चौबे व परवेज या दोघांचा मृत्यू झाला. उर्वरित अन्य पाच जखमींवर नागपूर येथे उपचार सुरू आहेत.

या घटनेसंदर्भात कंपनीचे मालक, व्यावसायिक व कंत्राटदार यांच्यावर देवरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली आहे. अजून काहीजणांना अटक करण्यात येणार असून पोलिसांचा तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details