गोंदिया - नागपूर आणि गोंदियाच्या अबकारी विभागाने संयुक्त कारवाई करत गोंदिया शहरात अवैधपणे सुरू असलेल्या बनावट देशी मद्य निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली आहे. यावेळी तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गोंदियात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड - state excise department
यावेळी तब्बल ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नागपूरच्या भरारी पथकाला शहरालगत असलेल्या वाजपेयी नगरमध्ये राईस मिलच्या मागे बनावट देशी दारू तयार करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे शहानिशा करत आज सायंकाळी ७ च्या सुमारास धाड टाकली असता या ठिकाणी बनावट देशी मद्य तयार करण्याचा कारखाना आढळून आला. या बनावट देशी दारूच्या कारखान्यात बनावट देशी दारूचे लेबल, स्प्रिंटत, रिकाम्या बाटल्या, पॅकिंग साहित्य आणि या देशी दारूच्या निर्यातीकरता तयार बॉक्स आढळून आले आहेत.
या सोबतच या दारूला दुसरीकडे नेणारे वाहन ही अबकारी विभागाने पकडले आहे. या वाहनात दारूच्या बाटल्या आढळून आलेल्या आहेत. हा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.