गोंदिया- जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील कोहमारा गोंदिया महामार्गावर परसोडी सडक गावाजवळ अपघात झाला. या ट्रक- दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली.
ट्रक-दुचाकी अपघातात मध्यप्रदेशच्या माजी आमदाराचा मुलगा जागीच ठार - gondia former MLa son dead
गोंदियावरून महाराष्ट्र शासनातर्फे तांदळाचा पुरवठा करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असून या पैकीच एक ट्रकच्या धडकेत या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
गोंदियावरून महाराष्ट्र शासनातर्फे तांदळाचा पुरवठा करणारे ट्रक मोठ्या प्रमाणात जात असून या पैकीच एक ट्रकच्या धडकेत या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गडचिरोली जिल्ह्यातील चिखली या आपल्या सासुरवाडीवरून मृत व्यक्ती दुचाकीने आमगाव या आपल्या स्वगावी जात होता. दरम्यान झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच झाला आहे. त्याच्या आधार कार्ड वरून त्याचे नाव दुष्यंतकुमार भागवत नागपुरे (वय, 61 वर्ष, राहणार मॉडेल कॉलोनी आमगाव) असे असून त्याचे वडील मध्यप्रदेशचे माजी आमदार आहेत.