महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तब्बल सहा लाख रुपयांचा गांजा जप्त; छत्तीसगडचे ४ आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात - गोंदिया पोलीस

गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोर चार संशयित लोक फिरताना आढळले. त्यांची झडती पोलिसांनी केली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये गांजा आढळून आला. आरोपी वरीदर सिंह, कुलदीप सिंह (वय-३०), शंकर पंचू निषाद (वय-४१), जितेंद्रकुमार बच्चूलाल श्रीवास्तव (वय-४०) हे सगळे रामनगर छत्तीसगड येथील आहेत.

तब्बल सहा लाख रूपयांचा गांजा जप्त; गोंदिया शहर पोलिसांची कारवाई

By

Published : Nov 14, 2019, 1:01 PM IST

Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST

गोंदिया - छत्तीसगड राज्यातून गांजा व इतर अमली पदार्थ जिल्ह्यात विक्रीला आणणाऱ्या चार आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 32 किलो गांजा जप्त केला असून 6 लाख रुपये किमतीचा माल असल्याचे निष्पन्न झाले आहे. या चारही आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तब्बल सहा लाख रुपयांचा गांजा जप्त; छत्तीसगडचे ४ आरोपी गोंदिया पोलिसांच्या ताब्यात

हेही वाचा - व्हॉट्सअॅप स्टेट्स पाहून चोरले ३ कोटी रुपयांचे सोने

गोंदिया शहरातील निर्मल टॉकीज समोर चार संशयित लोक फिरताना आढळले. त्यांची झडती पोलिसांनी केली असता त्यांच्याजवळील बॅगमध्ये गांजा आढळून आला. आरोपी वरीदर सिंह, कुलदीप सिंह (वय-३०), शंकर पंचू निषाद (वय-४१), जितेंद्रकुमार बच्चूलाल श्रीवास्तव (वय-४०) हे सगळे रामनगर छत्तीसगड येथील आहेत. प्रकाश बारूक बोरकर (वय-28) हा कुंभारटोली आमगावचा रहिवासी आहे. शहर पोलिसांनी मादक पदार्थ विरोधी अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा - ऑनलाईन दारू मागवणे पडले महागात; ५० हजाराची केली फसवणूक

Last Updated : Nov 14, 2019, 1:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details