गोंदिया- जिल्ह्यातील आमगाव तालुक्याअंतर्गत येत असलेल्या सितेपार या गावाची लोकसंख्या 3 हजारांच्यावर आहे. या गावातील समस्यांकडे मागील पाच वर्षात वारंवार लोकप्रतिनिधींचे लक्ष दिले नाही. तसेच त्या समस्या मार्गी लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत 21 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या समस्या मार्गी लागणार नाही, तोपर्यंत आम्ही मतदानाचा हक्क बजावणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे
....म्हणून सितेपारवासीयांचा निवडणुकीवर बहिष्कार - by cot on maharashtra vidhansabha election
गावातील समस्यांकडे मागील पाच वर्षात वारंवार लोकप्रतिनिधींचे लक्ष दिले नाही. तसेच त्या समस्या मार्गी लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे येथील सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत 21 ऑक्टोबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत आमच्या समस्या मार्गी लागणार नाही, तोपर्यंत आम्ही मतदानाचा हक्क बजावणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे
हेही वाचा - महाराष्ट्राच्या प्रचार मैदानातून सोनियांची माघार?
सितेपारवासीयांनी यासंबंधीचे निवेदन तहसीलदार तथा तालुका निवडणूक अधिकारी यांना दिले आहे. यावेळी दिलेल्या निवेदनातून आमदार, लोकप्रतिनिधी व प्रशासन गावातील समस्यांकडे कानाडोळा करत असल्याने गावाचा विकास रखडला आहे. लोकप्रतिनिधी फक्त आश्वासन देतात. परंतु समस्या सोडवत नाहीत. सामूहिक बहिष्कार टाकण्यामागे गावकऱ्यांच्या काही मुलभूत गरजा व मागण्या आहेत. त्यात गावात प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात यावी, पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, स्थायी तलाठी कार्यालय, धान खरेदी केंद्र सुरू करावे, ग्राहक सेवा केंद्र सुरू करण्यात यावे, सितेपार ते कालीमाटी, गुदमा, कट्टीपार, भजियापार, गुदमा रेल्वे या गावालगतच्या रस्त्यांची दुरूस्ती करण्यात यावी, पोस्ट ऑफिस कार्यालयाची स्थायी इमारत तयार करण्यात यावी यासारख्या मागण्यांचा समावेश आहे. या समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी 21 ऑक्टोबरला होणाऱया विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.