गोंदिया -राज्य सरकारच्यावतीने राज्यात कोणीही उपाशी राहु नये या उद्देशातून आज आज प्रजासत्ताक दिनापासून १० रुपयात 'शिवथाळी' या जेवण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. गोंदिया शहराच्या मध्य ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला. यात, गोर-गरीब आणि गरजू नागरिकांना १० रुपयात शिवथाळी देण्यात आलेली आहे.
आज राज्यभरात महाविकास आघाडीतर्फे 'शिवथाळी' योजनेला 26 जानेवारी पासून संपूर्ण राज्यात सुरुवात करण्यात आली. गोंदियाचे पालकमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील आंबेडकर चौकातील पाटक कँटीन येथे 'शिवथाळी'चा ठेका देण्यात आला आहे. गृहमंत्री देशमुख आणि आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते या 'शिवथाळीचे' वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केलं असून, खऱ्या अर्थाने गोर गरीब जनतेला या 'शिवथाळी'चा फायदा होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.