महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

६ हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर करुन शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा - navratry festival in gondia

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी अशा प्रकारचा देखावा उभारण्यात आला आहे. शारदा देवीच्या मूर्तीसह इंदोर येथील हर सिद्धकी मातेची मूर्तीची या मंडळाने स्थापना केली आहे.

६ हजार रिकाम्या बॉटल्सचा वापर करुन शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा

By

Published : Oct 8, 2019, 11:03 AM IST

गोंदिया -जिल्ह्यात दरवर्षी दुर्गा उत्सव आणि शारदा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात तब्बल ५३१ शारदा देवींची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी विविध देखावे देखील उभारले आहेत. मात्र, यामध्ये आकर्षक ठरतोय, तो म्हणजे शारदा उत्सव मंडळाने साकालेला प्लास्टिकच्या बॉटल्सचा देखावा.

शहराच्या मालवी वार्डातील सार्वजनिक शारदा उत्सव मंडळाने तब्बल ६ हजार रिकाम्या पाण्याच्या आणि शीत पेयाच्या बॉटल्सचा वापर करून हा देखावा तयार केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी अनेक भाविक गर्दी करत आहेत.

शारदा मंडळाने साकारला अनोखा देखावा

हेही वाचा -गोंदिया : इंगळे चौकातील महाराणी देवीसमोर जोगवा नृत्य सादर

प्लास्टिक मुक्तीचा संदेश देण्यासाठी अशाप्रकारचा देखावा उभारण्यात आला आहे. शारदा देवीच्या मूर्तीसह इंदोर येथील हर सिद्धकी मातेची मूर्तीची या मंडळाने स्थापना केली आहे. विशेष बाब म्हणजे हे मंडळ दरवर्षी सामाजिक संदेश देणारे तसेच पर्यावरण पूरक देखावे साकारतात. या मंडळाला जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देखील मिळत असतो.

हेही वाचा -गोंदियात 'या' एकाच ठिकाणी सर्व समाजातील स्त्रियांसाठी आयोजित होतो रास गरबा

ABOUT THE AUTHOR

...view details