गोंदिया- जिल्ह्यात एका तरुणीवर झालेला अॅसिड हल्ला असेल किंवा हैदराबाद येथील डॉक्टर तरुणीवर झालेले अत्याचार, अशा प्रकारच्या घटनांमुळे संपूर्ण देश हादरला होता. त्यानंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातून काहींची विकृत मानसिकता आणि दुय्यम वागणुकीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या समस्येच्या सोडवणुकीसाठीच पोलिसांनी निर्भया पथके स्थापन केली. मात्र, आता शाळकरी मुलींना निर्भया पथकाची गरज भासणार नाही. कारण जिल्ह्यातील मुलींनी आता आत्मसंरक्षणाचे धडे घेतले आहेत.
मुलींना आत्मसुरक्षा धडे शिवण्यासाठी गेम्स स्पोर्ट अॅण्ड करीअर डेव्हलपमेंट फांउडेशनच्या वतीने गोंदियात निर्भया बेटी सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गोंदिया शहरातील तब्बल 25 शाळेतील हजारच्या वर शालेय विद्यार्थींनींना या फॉऊंडेशनच्या वतीने आत्मसंरक्षणाचे धडे देण्यात आले आहेत. या 10 दिवसीय आत्मसुरक्षा शिबिरामुळे रोडरोमिओ आणि छेडछाड करणाऱ्यांवर आता चांगलीच जरब बसणार आहे.