महाराष्ट्र

maharashtra

गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागात पुन्हा गजबजल्या शाळा; १४२ शाळा सुरू

By

Published : Jul 15, 2021, 4:50 PM IST

Updated : Jul 15, 2021, 8:54 PM IST

गोंदिया जिल्ह्यात आज राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत यांच्या परवानगीने ठराव घेत 8 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली.

school
शाळेत जाताना विद्यार्थी

गोंदिया -गोंदिया जिल्ह्यात आज राज्य शासनाच्या निर्देशानुसार शाळा व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत यांच्या परवानगीने ठराव घेत 8 ते 12 वीचे वर्ग सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार आज १५ जुलैपासून जिल्ह्यातील 372 शाळांपैकी 142 शाळांचे ठराव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील 142 शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांकडून हमीपत्र घेऊनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. ज्यात खासगी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचा समावेश आहे.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

शाळांमध्ये कोरोना नियमांचे पालन -

शाळेत येण्याऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर, थर्मल चेकिंग, मास्क, ऑक्सिजन लेवल, प्लस रेट तपासून शाळेत प्रवेश देण्यात आला. तसेच सूचना फलकांचे काळजीपूर्वक वाचन करण्यास सांगण्यात आले. यावेळी मात्र विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसून आला. गोंदिया जिल्ह्यात वर्ग ८ ते १२ वीच्या ३७२ शाळांपैकी १४२ शाळा सुरू करण्याचा ठराव ग्रामपंचायतींनी घेतला आहे. त्यामुळे या शाळांपैकी काही शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.

दीड वर्षानंतर शाळा सुरू -

नक्षलग्रस्त देवरी, सालेकसा, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 8 वी ते 12 वी पर्यतच्या शाळा कोरोनाच्या सावटात पुन्हा विद्यार्थ्यांच्या किलबिलाटासह सुरू झाल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यातील शाळा, कॉलेज हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होत्या. मात्र, आता गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शाळा, कॉलेज सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. त्यामुळे आज दीड वर्षानंतर पुन्हा शाळा, कॉलेज बहरले आहेत.

Last Updated : Jul 15, 2021, 8:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details