गोंदिया - महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका शाळेतील स्वयंपाकीन महिलांना १० महिन्यांऐवजी १२ महिन्यांचे मानधन देण्यात यावे, या मागणीसाठी स्वयंपाकी महिलांनी सोमवारपासुन लक्षवेधी उपोषणाला सुरवात केली. जिल्हा परिषद कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येत्या २० तारखेपर्यंत हे आंदोलन चालणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेसमोर स्वयंपाकीन महिलांचे धरणे आंदोलन शाळा व्यवस्थापन समिती दोन महिलांना कामावर घेऊन एका स्वयंपाकी महिलेचे मानधन एक हजार रूपये वाटुन देत आहे. २०० ते ३०० विद्यार्थ्यांमागे तीन महिलांना प्रत्येकी एक-एक हजार रूपये घेण्यास बळजबरी करत आहेत. सदर मानधन अत्यल्प असुनही स्वयंपाकीन महिला व पुरूष शाळांमध्ये पोषण आहार शिजवुन देण्याचे काम करत आहे. म्हणुन स्वयंपाकीन महिलांना किमान वेतन लागु करण्यात यावे, अशी तक्रार आणि मागणी यावेळी स्वयंपाकी महिलांनी केली.
हेही वाचा...Exclusive: काश्मीरचाही विकास मुंबईसारखा व्हावा.. मराठी अन् काश्मिरींच्या भाव-भावना एकच
स्वयंपाकीन महिलांना सेवेतुन काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वयंपाकीन महिलांना शाळा व्यवस्थापन समिती इतर महिलांकडुन पैसे वसुल करून त्यांना कामावर घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मानधनातुन अर्धे मानधन दुसऱ्या महिलांना देण्याची हुकूमशाही शाळा व्यवस्थापन समित्या चालवत आहेत. अर्धे मानधन देत नसाल तर उद्यापासुन येऊ नका अशा धमक्या दिल्या जात असल्याचा आरोपही यावेळी स्वयंपाकी महिलांनी केला. तचेच शाळा व्यवस्थापन समित्यांनी शासनाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यामुळे शासन नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे व स्वयंपाकीन महिलांना नियुक्त करण्याचा अधिकार शाळा व्यवस्थापन समित्यांकडुन काढण्यात यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.