गोंदिया- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशभरात संचारबंदी लागू केली. या संचारबंदीला गोंदियामध्ये प्रतिसाद मिळत नव्हता. नागरिक अनेक बहाणे करून घराबाहेर पडत होते. मात्र दोन दिवसाआधी गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन जागे झाले. त्यामुळे नागरिकांनी भाजी खरेदीसाठी बाहेर पडू नये, म्हणून कृषी विभागाच्या वतीने बचत गटाच्या माध्यमातून डोअर टू डोअर भाजीपाला विक्री सुरवात केले आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावरुन नागरिकांच्या दारावर पोहोचतो भाजीपाला, बचत गट करते असे वितरण. . . . - नागरिक
दोन दिवसाआधी गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधित पहिला रुग्ण आढळल्याने जिल्हा प्रशासन जागे झाले. त्यामुळे कृषी विभागाने बचत गटाच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा अनोखा फंडा वापरला.
या योजनेसाठी गोंदियातील दोन बचत गटाची निवड करण्यात आली असून. हे बचत गट थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन भाजी खरेदी करुन ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवून भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे संचारबंदीत नागरिकांना भाजी खरेदीसाठी बाहेर जावे लागत नाही. ज्या नागरिकांना बाजारातून भाजी खरेदी करुन आणायची आहे, त्यांच्यासाठी नगर परिषदेने मुख्य बाजारपेठ शहरातील तीन ठिकाणी शाळेच्या प्रांगणात हलविले आहे.
दूर अंतर बाळगून भाजी विक्रेते व खरेदी करणाऱ्यांवर पोलिसांच्या निगराणीत भाजी खरेदी-विक्री करीत आहेत. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रभाव वाढणार नाही, याची खबरदारी प्रशासनाद्वारे घेण्यात येत आहे. मात्र नागरिकांनीही संचारबंदीचे पालन करून कोरोनाशी लढाई लढण्याची गरज आहे.