गोंदिया- 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' च्या संघटनेने मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची महाजानदेश यात्रा शनिवारी गोंदिया येथे आली होती. गोंदिया येथे मुख्यमंत्री सभास्थळी जात असताना नेहरू चौकात मुख्यमंत्र्यांच्या महाजानदेश यात्रेला थांबवत फलक दाखवण्यात आले.
गोंदियात 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' संघटनेकडून मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न - gondiya
गोंदिया येथे मुख्यमंत्री सभास्थळी जात असताना नेहरू चौकात महाजानदेशच्या बसला थांबवत फलक दाखवण्यात आले.
खुल्या व इतर प्रवर्गालाही मेरीटच्या आधारावर ५० टक्के जागा देण्यात याव्यात. या मागणीकरता 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' संघटनेने मुख्यमंत्र्यांचा ताफा थांबवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सभास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सभे दरम्यान आंदोलनकर्त्यांना आश्वस्त करीत, मुख्यमंत्र्यांनी त्यांचा मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
विधानसभा निवडणूका अवघ्या काही महिन्यांवर येवून ठेपल्यात. जनमताचा कौल घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा राज्यात निघाली आहे. ठिकठिकाणी या यात्रेचे स्वागत होत आहे. तर याला विरोधही होताना दिसत आहे.