गोंदिया - जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याचे तहसीलदार संजय रामटेके आणि माडगी येथील विपील कुंभारे याना भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. 70 हजार रूपयांची लाच घेताना या तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.
लाच स्वीकरताना तिरोडा तहसीलदार 'एसीबी'च्या जाळ्यात - अटक
70 हजार रूपयांची लाच घेताना या तहसीलदाराला अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की तक्रारदार रेती व्यावसायिकांचे तिरोडा तालुक्यातील बोदलकसा जंगलात तहसीलदार संजय रामटेके यांनी ट्रक अडवले. तसेच त्यांनी या ट्रकवर कारवाई न करण्यासाठी आणि ट्रक नियमित चालू ठेवण्यासाठी मासिक ३० हजार रुपये याप्रमाणे 70 हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक कार्यलयाकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने 70 हजार रोख रक्कम स्वीकारताना तहसीलदाराला अटक केली.
याप्रकरणी दोघांविरुद्ध तुमसर पोलीस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 1988 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.