गोंदिया-धनेगांव ते मुरकुटडोह या रस्त्यावर नक्षलवाद्यांनी पोलिसांना जीवे मारण्याच्या उद्देशाने दरम्यान स्फोटके पेरुन ठेवली होती. ही स्फोटके सालेकसा पोलिसांनी मंगळवारी निकामी केली. स्फोटके पेरुन ठेवली असल्यची नक्षल ऑपरेशन सेल, गोंदिया यांना गुप्तचरांकडून मिळाली होती.
नक्षलवाद्यांनी घातपातासाठी रस्त्यावर पेरुन ठेवलेली स्फोटके सालेकसा पोलिसांनी केली निकामी - नक्षलवाद्यांनी पेरलेली स्फोटके निकामी
सी-60 सालेकसा येथील 2 कमांडो पथक, बी. डी. डी. एस. पथक, नक्षल ऑपरेशन सेल गोंदिया व पोलीस ठाणे, सालेकसा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी धनेगाव ते मुरकुटडोह या रोडवर ऑपरेशन राबवले. या दरम्यान आढळलेली स्फोटके पोलिसांनी निकामी केली आहेत.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात सी-60 सालेकसा येथील 2 कमांडो पथक, बी. डी. डी. एस. पथक, नक्षल ऑपरेशन सेल गोंदिया व पोलीस ठाणे, सालेकसा येथील अधिकारी व कर्मचारी यांनी धनेगाव ते मुरकुटडोह या रोडवर ऑपरेशन राबवले. मौजा दलही स्प्रिंग पॉइंटच्या जवळ संशयास्पद वस्तू आढळून आल्याने बी. डी. डी. एस. पथकाच्या साहाय्याने खबरदारी घेत पाहणी करण्यात आली. पाहणी दरम्यान आ. ई. डी. पेरुन ठेवल्याचे दिसून आले.
आ. ई. डी. स्फोटक बी. डी. डी. एसच्या पथकाने निकामी करुन बाहेर काढले. त्यामध्ये सिल्वर रंगाचा ॲल्युमिनियम बेस एक्सप्लोझिव्ह, इलेक्ट्रिक डेटोनेटर, जर्मन डब्बा कंटेनर अंदाजे पाच ते सहा किलो, स्पिलंटर, इलेक्ट्रिक वायर, बॅटरी असे स्फोटक साहित्य नक्षलवाद्यांनी घातपात घडवून आणण्यासाठी पेरुन ठेवल्याचे आढळून आले. सदर साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील कारवाई सालेकसा पोलीस करत आहेत.