महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ, महिन्याभरात ५ दुकाने फोडून लाखोंची चोरी - Thief catch in CCTV

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या साखरीटोला येथील महिन्या भरात ५ दुकाने फोडुन लाखो रुप चोरांनी चोरीकरून फरार झालेले पोलीस प्रशासन या घटनेला गांभीर्य घेत नसल्याने गावात दहशतीचा वातावर निर्माण झाला तसेच एक मेडिकल चोर चोरी करताना त्या मेडिकल दुकानाच्या सीसी टीव्ही कॅमरेत चोरी करताना कैद झाले आहे.

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ

By

Published : Jun 26, 2019, 8:40 PM IST


गोंदिया - जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील चोरट्याने लाखो रुपयांवर डल्ला मारला. आशीष अग्रवाल यांच्या मेडीकल स्टोअर्सचे शटर तोडुन त्यांच्या ऑफिसच्या ड्रावरमधून चोराने नगदी २ लाख ८५ हजार रुपये चोरून नेले. ही घटना २४ जूनच्या मध्यरात्री घडली.

गोंदिया जिल्ह्यात चोरांचा धुमाकूळ

सकाळी आशिषचे वडील ललीत अग्रवाल फिरायला जाण्यासाठी घराबाहेर पडले असता त्यांना मेडीकल स्टोअर्सचे शटर खुले दिसले. आमगाव-देवरी मार्गावर साखरीटोला मुख्य मार्गावर असल्याने चोरीच्या अनेक घटना घडत आहेत. आशिष अग्रवाल यांचे बालाजी मेडीकल स्टोअर्स मुख्य मार्गाला लागून आहे. चोरट्यांनी सर्व प्रथम दुकानाबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरे दुसऱ्या बाजूला वळवून शटरचे कुलूप तोडले व आत प्रवेश केला. मेडीकल व बॅकींगचे काम बाजूला असलेल्या खोलीत सुरू असते. त्यात असलेल्या ड्रावरमध्ये सदर रक्कम ठेवली होती. ती चोरट्यांनी लंपास केली.

चोरी करत असताना चोराच्या हातात कोयता दिसत आहे. सदर घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांचे श्वान पथक दाखल झाले. सध्या होत असलेल्या चोरीच्या घटनांचा तपास सुरू आहे. यापूर्वी देखील याच परिसरातील दोनोडे कृषी केंद्र, मॉ गंगा किराणा स्टोर्स, डोंगरे कृषी व किराणा स्टोर तसेच गजभिये यांच्या घरातही चोरीच्या घटना घडून आल्या होत्या. त्यामध्येही लाखो रूपये चोरट्यांनी चोरून नेले. सदर घटनेमुळे परिसरात व गावात दहशत वातावरण निर्माण झाले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details