महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गोंदियात कोरोनाने मृत्यू झालेल्या पिता-पुत्राच्या घरी पाच लाखांची घरफोडी - तिरोडा कोरोना मृत्यू

बीरशी येथील एका कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि त्यांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटुंबातील इतर सदस्य क्वारंन्टाइन सेंटरमध्ये आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या कृषी सेवा केंद्राचे कुलूप कापून आत प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून रोख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

theft
चोरी

By

Published : Aug 25, 2020, 12:35 PM IST

गोंदिया - जिल्ह्यात कोरोनाने मृत्युमुखी पडलेल्या पिता-पुत्राच्या घरी कुणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी मोठी चोरी केली. या चोरीत रोख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल चोरी गेला आहे. तिरोडा तालुक्यातील बिरशी फाटा येथे ही घटना घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.

कोरोनाने मृत्यू झालेल्या पिता-पुत्राच्या घरी पाच लाखांची घरफो

बीरशी येथील एका कृषी सेवा केंद्राचे संचालक आणि त्यांच्या मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटुंबातील इतर सदस्य क्वारंन्टाइन सेंटरमध्ये आहेत. त्यामुळे त्यांचे कृषी केंद्र व वरच्या मजल्यावर असलेले त्यांचे निवासस्थान बंद होते. पिता-पुत्रांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने हा परिसरही कंटेन्मेंट झोन म्हणून सील करण्यात आला होता. या परिस्थितीचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या कृषी सेवा केंद्राचे कुलूप कापून आत प्रवेश केला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून रोख रकमेसह पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला.

या घटनेची माहीती मिळताच तिरोडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून श्वानपथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. श्वानाने कुठलाही माग काढला नसला तरी ठसे तज्ज्ञांना काही ठसे मिळून आले आहेत. हे ठसे व रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध केलेला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details